जामनेर Videos in Marathi

VIDEO: गिरीश महाजनांचा एसटीतून प्रवास

बातम्याJun 1, 2019

VIDEO: गिरीश महाजनांचा एसटीतून प्रवास

जळगाव, 1 जून: महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एसटीने प्रवास केला. सकाळी 8 वाजता महाजन यांनी आपल्या शासकीय वाहनाऐवजी एसटीने जळगाव ते जामनेर असा प्रवास केला. या प्रवासाआधी त्यांनी जळगाव बस आगाराची पाहणीही केली. यावेळी जळगाव आगाराच्या अधिकाऱ्यांनी महाजन यांचा सत्कार केला. दरम्यान स्वत: मंत्री आपल्यासोबत प्रवास करत असल्याचं पाहून बसमधील प्रवासीही आनंदी होते.