News18 Lokmat

#जळगाव

Showing of 807 - 820 from 947 results
राज्यभरात सोनोग्राफी सेंटर्सवर धडक कारवाई

बातम्याJun 8, 2012

राज्यभरात सोनोग्राफी सेंटर्सवर धडक कारवाई

08 जूनस्त्री भ्रूण हत्येच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली आहे. रायगड हिंगोली,धुळे,जळगाव जिल्ह्यात सोनोग्राफी सेंटर्सवर कारवाई सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात 14 सोनोग्राफी सेंटर्स सील करण्यात आली आहे. यातली 10 सेंटर्स भुसावळ तालुक्यातली आहेत. जळगाव 220 सेंटर्सची तपासणी सुरू आहे. येत्या दोन दिवसांत ही तपासणी पूर्ण होईल. यासाठी 21 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार, मुख्याधिकारी, वैद्यकीत अधीक्षक, पोलीस अधिकारी यांचा यात समावेश आहे. रायगडात दोन सोनोग्राफी मशिन्स जप्ततर रायगडमध्ये दोन अनधिकृत सोनोग्राफी मशिन्स जप्त करण्यात आली आहेत. मुंबई पुुणे महामार्गाच्या मध्यावर असलेल्या सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहेत. खोपोलीतल्या सुप्रभा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे सोनोग्राफी सेंटर चालवले जात असल्याची माहिती नगर प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाक ली तेव्हा ही बेकायदेशीर मशिन्स सापडली. याप्रकरणी हॉस्पिटल प्रशासन आणि डॉ. आर एम पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत एक सोनोग्राफी सेंटर सीलसंपूर्ण मराठवाड्यात सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. या कारवाई अंतर्गत हिंगोली शहरातलं आदिती सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलंय. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक जाधव आणि तहसिलदार यांच्या पथकाला या सेंटरवर अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात 24 सोनोग्राफी सेंटर्स आहेत. या सेंटर्सची तपासणी करण्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे.