#जळगाव

Showing of 404 - 410 from 410 results
लोकांनी वाळीत टाकलं, अन् कुपोषणानं कवटाळलं !

बातम्याSep 17, 2012

लोकांनी वाळीत टाकलं, अन् कुपोषणानं कवटाळलं !

अलका धुपकर, बुलडाणा17 सप्टेंबरसातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये वसलेल्या आदिवासींचं जगणं हे टीव्हीच्या झगमगाटापासून खूप दूर आहे. मध्यप्रदेशाच्या सीमेवर वसलेल्या या आदिवासींना कधी परराज्यातले म्हणून हिणवलं जातं. तर कधी, व्याघ्रप्रकल्पाच्या पुनवर्सनात त्यांनी डोंगरकुशीतली गावं सोडून जावं अशी फर्मानं काढली जातात. पण, या सगळ्या गावांगावात कुपोषणाचं थैमान सुरु आहे. कुपोषणाचा हा छुपा रोग मुलांना पोखरतोय.सुरजाबाई टोटा आणि तिची कुपोषित मुलगी...जून महिन्यात झालेल्या दोघांच्याही मृत्यूनंतर बुलडाण्यातलं दडलेलं कुपोषण उजेडात आलं. सातपुड्याच्या रांगांत वसलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद.. या दोन तालुक्यातल्या याच दुर्गम गावांत जाण्यासाठी आम्ही निघालो. प्रवास जरी गाडीतून सुरू झाला. तरी शेवटी तो आम्हाला पायीच पूर्ण करावा लागला. पावसाळ्यात या गावांमध्ये चिखल तुडवत पायी जाणं हा एकच रस्ता असतो. गारलीबाई सोळंकीची पाचवी मुलगी पवरा तग धरून आहे. कुपोषणातून आलेल्या अशक्तपणामुळे ती सतत अशी रडत -किरकिरत असते. पोटच्या पोराच्या वेदना हताशपणे बघण्याशिवाय.. या गरिबीने पिचलेल्या पालकांसमोर दुसरा मार्गच नाही.चाळीसटापरी गावातून आम्ही आलेवाडीमध्ये पोचलो. दीड वर्षाच्या परवीना सुरतने या चिमुरडीकडे दोन क्षण बघण्याची हिंमतही होत नव्हती. कुपोषणाने अंगभर उठलेले फोड... हातापायाच्या काड्या....मृत्यूच्या दारातच जणू परवीना उभी होती.परवीनाच्या वडिलांनी तिच्या आईला सोडून दुसरा संसार मांडलाय. पण तीव्र कुपोषित परवीनाला अशा अवस्थेत सोडून सुपडी कामावर जाऊ शकत नाही. म्हणून मग तिने साबयाना या तिच्या 10 वर्षांच्या मुलीलाच रोजीवर पाठवायला सुरुवात केली. परवीना ही बुलडाण्यातल्या कुपोषणाचा चेहरा आहे...दुर्गम भागांतल्या गावागावांत अशा परवीना आम्हाला भेटल्या. मुलं कुपोषित झाली की कुपोषणाची ग्रेड सरकारच्या कागदोपत्री नोंदवली जाते. पण या आकडेवारीच्या मागे दडलेल्या परवीनासारख्या जीवांचं मोल सरकारला कधी कळणार ? बुलडाण्यातलं दडवलेलं कुपोषण- तीव्र कुपोषित सॅम कॅटेगरीतील मुलांची संख्या - 209- मॅम- मध्यम कुपोषित मुलं- 666- एनआरएचएमNRHM राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेतून 58.42 कोटीचा निधी मंजूर- हा निधी कुपोषण मुक्तीच्या कार्यक्रमाकरिता विशेष दिला जातो

Live TV

News18 Lokmat
close