#जयललिता

Showing of 131 - 135 from 135 results
तामिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरीत मतदानाचा उच्चांक

बातम्याApr 13, 2011

तामिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरीत मतदानाचा उच्चांक

13 एप्रिलतामिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरी या तीन राज्यात शांतेत पण मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. अनेक मतदान केंद्रावर लोकांची गर्दी पाहायला मिळली. केरळमध्ये 140 जागांसाठी आज तब्बल 74 टक्के मतदान झालं. 971 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन आणि विरोधी पक्षनेते ओमन चंडी यांनी सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला. केरळमध्ये 45 टक्के मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार आहेत. त्यांचा कल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालची संयुक्त पुरोगामी आघाडी आणि डावी लोकशाही आघाडी यांच्यात प्रचारादरम्यान मोठा वाद रंगला. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्तापालट होण्याची परंपरा आहे. त्यामुळे यावेळी आपली सत्ता येईल, असा विश्वास युडीएफला वाटतोय. केरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तामिळनाडूत 75, केरळमध्ये 74 तर पाँडिचेरीत 83 टक्के मतदान झाले.विधानसभेच्या 234 जागांसाठी तामिळनाडूत आज 75 टक्के मतदान झालं. मुख्यमंत्री करुणानिधी, उपमुख्यमंत्री ए. के स्टॅलिन आणि अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांचं भवितव्य आजच्या मतदानातून ठरणार आहे. द्रमुकवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सत्तापालट होईल, अशी आशा जयललितांना आहे. तर करुणानिधी यांनी पुन्हा सत्तेत येण्याचा विश्‍वास व्यक्त केला. पाँडिचेरीतही विधानसभेच्या 30 जागांसाठी आज मतदान झालं. इथं उच्चांकी म्हणजे 83 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला...सत्ताधारी काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवतंय. तर सहकारी पक्ष द्रमुक 10 जागा लढवतंय.

Live TV

News18 Lokmat
close