#जम्मू काश्मीर

Showing of 521 - 534 from 537 results
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखेरचा टप्पा

बातम्याMay 12, 2009

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखेरचा टप्पा

12 मे पंधराव्या लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार काल संपला आणि गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी थांबली. बुधवारी 13 मे रोजी पाचव्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 86 जागांसाठी मतदान होत आहे. शेवटच्या टप्प्यात पी.चिदंबरम, मोहम्मद अझरुद्दीन, टी आर बालू, ए. राजा यांचे निकाल मतपेटीत बंद होणार आहेत. तसंच एमडीएमकेचे वायको, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाच्या जयाप्रदा रिंगणात आहेत. शेवटच्या टप्प्यात अझरुद्दीनचीही कसोटी लागणारेय. तो उत्तरप्रदेशातल्या मोरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवतोय. तर अमृतसरमधून नवज्योतसिंग सिद्धू आणि गुरुदासपूरमधून विनोद खन्ना निवडणुकीच्या रिंगणात आहे. तामिळनाडूत 39 जागांवर, पश्चिम बंगालमध्ये 11 , उत्तरप्रदेश 14, उत्तराखंड 5, पंजाब 9 , हिमाचल प्रदेश् 4, जम्मू काश्मीर 2, तर चंदीगड आणि पाँडिचरीमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. केंद्रात सरकार कुणाचं हे ठरवण्यासाठी या दोन राज्यांची भूमिका खूपच महत्त्वाची ठरणार आहे. एकूण जागा - 867 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशउमेदवार - 1432आरती महिला उमेदवार - 93मतदार - 10 कोटी 78 लाख मतदान केंद्र - 1 लाख 21 हजार 632मतदान कर्मचारी - 5 लाखसंवेदनशील गावं - 5995