जम्मु काश्मिर Videos in Marathi

उत्तर भारतीयांची महाराष्ट्रात सशस्त्र घुसखोरी

बातम्याAug 16, 2012

उत्तर भारतीयांची महाराष्ट्रात सशस्त्र घुसखोरी

विलास बडे, मुंबई16 ऑगस्टकामाच्या निमित्ताने उत्तर भारतातून महाराष्ट्रात लाखो लोक येतात. पण या लोढ्यांमधील अनेक जण उत्तर भारतातून शस्त्र घेऊन येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तर भारतातून शस्त्र घेऊन येणारे लोक राज्यात खासगी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळवत आहेत. उत्तरप्रदेश, बिहार, जम्मू काश्मिर आसाम या राज्यांमधून अगदी सहजपणे शस्त्र परवाने मिळवले जातात आणि त्याच शस्त्रांच्या बळावर महाराष्ट्रात येऊन हे उत्तर भारतीय नोकरी मिळतात. हे सर्व बेकायदेशीर आहे. असे हजारोंच्या संख्येनं आलेल्या बंदुकधारी परप्रांतीयांमुळे महाराष्ट्राचीच सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून महाराष्ट्रात लोकांचे लोंढे येतात, हे सगळ्यांना महितीये. पण यातले अनेक जण सशस्त्र येतात, हे कुणाला ठाऊक नाही. या राज्यांमध्ये सहज मिळणार्‍या परवान्यांमुळे.. त्यांना बंदुका बाळगता येतात. आणि याच्याच जोरावर ते महाराष्ट्रात येऊन सुरक्षा रक्षकांच्या नोकर्‍या मिळवतात.उत्तरप्रदेश, बिहार, जम्मु काश्मिर, आसाम या राज्यांमध्ये खोटी कारणं सांगून किंवा चिरीमिरी देऊन सहज परवाने मिळवले जातात. असे परवाने मिळवून हजारो परप्रांतीय बंदुकांसोबत महाराष्ट्रात दाखल झाले आहे. हा प्रकार गेले अनेक दिवस पोलिसांच्या नजरेसमोर बिनबोभाटपणे सुरु आहे. राज्यातील अशा सशस्त्र लोंढ्यांची संख्या नेमकी किती याची माहिती सरकारकडे नाही. पण ही संख्या काही हजारांध्ये असल्याची धक्कादायक माहिती हेच सुरक्षा रक्षक देताहेत.महाराष्ट्रात एकीकडे हे परवाने मिळवणं कठीण असताना..दुसरीकडे राज्यात गेल्या काही वर्षांत शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची मागणी वाढली. ही मागणी परप्रांतीय भरून काढत आहे. हे तरूण महाराष्ट्रात यावेत यासाठी आणि आल्यानंतर त्यांना नोकरी, राहण्यासाठी जागा मिळावी. यासाठी मोठी यंत्रणा इथे काम करतेय. यामागे अनेकांचे छुपे हेतू असल्याचा आरोप राज्यातले कामगार नेते करत आहेत.अशा प्रकारे खासगी सुरक्षेसाठी मिळालेल्या लायसन्सचा वापर करून नोकर्‍या मिळवणं हे बेकायदेशीर आहे आणि त्यांच्यावर आम्ही कारवाई करु असं पोलिस सांगत आहेत.राज्यात सुरक्षेच्या नावाने सुरक्षेशीच खेळ सुरु आहे. पण पोलीस यंत्रणा मात्र त्यावर कठोर पावलं उचलत नाहीय. आधी तुळजापूर आणि आता वडाळ्याच्या घटनेनंतर तरी गृहमंत्री यांच्यावर कारवाई करतील का, हा प्रश्न आहे.

ताज्या बातम्या