24 सप्टेंबरमुंबई झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला दोषी अतिरेकी अजमल कसाबचा दयेचा अर्ज फेटाळावा अशी विनंती राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. यासंदर्भात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक पत्र पाठवलं आहे. आता मुख्यमंत्री राज्यपालांच्या मार्फत हे पत्र राष्ट्रपतींना पाठवणार आहेत. अजमल कसाबने आपल्याला फाशी ऐवजी जन्मठेप द्यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावत फाशीवर शिक्कामोर्तब केलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कसाबने दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केला आहे.अजमल आमिर कसाब याला पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून फाशी देण्यात आली.गुन्हा क्र. 1भारताविरोधात युद्ध पुकारणं(शिक्षा-फाशी)गुन्हा क्र. 2बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत अतिरेकी कारवाईप्रकरणी दोषी (शिक्षा-फाशी)गुन्हा क्र. 3हल्ल्याचा कट आखणे (शिक्षा-फाशी)गुन्हा क्र. 4पोलीस अधिकारी अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकारम ओंबाळे, अमरसिंह सोळंकींसह 7 जणांची हत्या करणे(शिक्षा-फाशी)गुन्हा क्र. 5159 जणांच्या हत्येसाठी चिथावणी देणे (शिक्षा-फाशी)