#जन्मठेप

Showing of 118 - 131 from 131 results
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जन्मठेप

बातम्याAug 31, 2012

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जन्मठेप

31 ऑगस्टशिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्यासह 12 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोक्का कायद्या अंतर्गत या बाराही आरोपांना दोषी ठरवण्यात आलं आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांचा सुपारी देऊन खून करण्याच्या प्रकरणात मोक्का कायद्यानुसार ही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.मुंबईने आजवर अनेक अंडरवर्ल्ड डॉन्स पाहिले. पण यातला कोणताही डॉन कायद्याच्या कचाट्यात सापडू शकला नाही. पण आता अरूण गवळीला एका खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईतल्या घाटकोपर असल्फा इथले शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची 2 मार्च 2007 ला हत्या करण्यात आली. जामसांडेकर हे आपल्या घरात बसलेले असताना दोन अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणी अरूण गवळीसोबत बारा जणांना कोर्टाने दोषी ठरवलंय. गवळी आणि इतरांना मोक्का लावण्यात आला होता. चार वर्षं खटला चालल्यानंतर.. मुंबई सेशन कोर्टातल्या न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी अरुण गवळीसोबत बारा जणांना दोषी ठरवलं.गुन्हेशाखेचे पोलीस सह आयुक्त हिमांशू रॉय, जामसांडेकर केसमध्ये आज गवळी आणि बारा जणांना दोषी ठरवण्यात आलं. न्यायालयाने आमच्या तपासाची प्रशंसा केलीय. हे आमचं यश आहे.क्राईम ब्रँचने चार वर्षांच्या तपासानंतर हे यश मिळवलंय. शिवसेनेचे नगरसेवक जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी साहेबराव भिंताडे यांनी दिल्याचं सिद्ध झालंय.साहेबराव हा शिवसेनेत उपशाखाप्रमुख असताना जामसांडेकर हे त्यांचे सहकारी होते.मात्र, जामसांडेकर प्रथम अपक्ष निवडून आलेत. त्यानंतर त्यांनी भिंताडे यांचा तीन वेळा पराभव केला.त्यामुळे चिडून साहेबराव भिंताडे याने तीस लाखाची सुपारी देऊन जामसांडेकर यांचा गवळी मार्फत काटा काढला.जामसांडेकर खून खटला- साहेबराव भिंताडेने जामसांडेकरांची सुपारी गवळीचे सहकारी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांना दिली - जामसांडेकर यांना मारण्यासाठी गवळी गँगने 30 लाख रुपयांची सुपारी घेतली- अरुण गवळीने जामसांडेकर यांना मारण्याची जबाबदारी प्रताप गोडसेवर सोपवली- प्रताप गोडसेने हे काम विजय गिरीवर सोपवलं- विजय गिरीने नगरसेवक जामसांडेकर यांच्यावर गोळी झाडली- या कामात नरेंद्र गिरी, अशोक जैयस्वाल, अनिल गिरी यांनी पाळत ठेवून मदत केलीपण अरूण गवळी निर्दोष असल्याच्या दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. ते आता हायकोर्टात अपील करणार आहेत. या प्रकरणातील इतर सुरेंद्र पांचाळ, गणेश साळवी आणि दिनेश नारकर यांना पुराव्याअभावी सोडण्यात आलंय. तर आरोपी बाळा सुर्वे याचा न्यायालयीन कोठडीत आजारपणा मुळे मृत्यू झाला. डॅडीचे कारनामे- आत्तापर्यंत 15 खुनांचे खटले- 14 खटल्यातून निर्दोष सुटका- गेल्या 32 वर्षात पहिल्यांदाच शिक्षा - जामसांडेकर प्रकरणात पहिल्यांदाच दोषी- खून, खुनाचा प्रयत्न, धमकावणं, खंडणी उकळणं अशा 48 केसेस दाखल- 1980 सालापासून गुन्हेगारीत सक्रीय- गवळी गँगचा प्रमुख- 1998 साली 'अखिल भारतीय सेना' राजकीय पक्ष स्थापन- 2004-09 मध्ये चिंचपोकळीचे आमदार- 2002 मधून लोकसभा निवडणूक लढवली- 1 लाख 10 हजार मतं मिळवून तिसर्‍या क्रमांकाचा उमेदवार- 2009 ला विधानसभा निवडणुकीत पराभव

Live TV

News18 Lokmat
close