जनलोकपाल विधेयक

Showing of 53 - 56 from 56 results
अण्णांच्या समर्थनार्थ उसळला जनसागर

बातम्याAug 19, 2011

अण्णांच्या समर्थनार्थ उसळला जनसागर

19 ऑगस्ट3 दिवसांनंतर अखेर अण्णा हजारे तिहार जेलमधून बाहेर आले.आणि यावेळी अण्णांच्या समर्थनार्थ जनसागर उसळला होता. दिल्लीत मुसळधार पाऊस पडत असताना हजारोंच्या संख्येनं समर्थक रस्त्यावर हजर होते. या समर्थकांमध्ये तरुण-तरुणी, ज्येष्ठ, वयोवृद्ध सगळ्यांचाचे समावेश होता.यावेळी अण्णांनी हा पाठिंबा बघून आपला उत्साह दुणावल्याचे सांगितले. त्यांनी समर्थकांना आवाहन केलं जगात क्रांतीचा नवा आदर्श घालून द्या असं आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केलं.जनलोकपाल विधेयक जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहील. असा निर्धारही अण्णांनी व्यक्त केला. अण्णांच्या आवाहनानीं समर्थकांमध्ये एक नवा उत्साह संचारला तर हजारोच्या संख्येनं जमलेल्या समर्थकांना बघून अण्णांचा उत्साहही दुणावंला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading