जनलोकपाल विधेयक

Showing of 40 - 53 from 56 results
42 वर्षांपासून रखडले लोकपाल विधेयक - सुषमा स्वराज

बातम्याAug 27, 2011

42 वर्षांपासून रखडले लोकपाल विधेयक - सुषमा स्वराज

27 ऑगस्टअखेर अण्णांच्या जनलोकपाल विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू झाली. आज प्रणव मुखर्जी यांच्या निवेदनापासुन चर्चेला सुरूवात झाली. गेल्या 12 दिवसांपासुन अण्णांचे उपोषण सुरूच आहे. अण्णांनी आपले उपोषण सोडावे अशी विनंती प्रणव मुखर्जी यांनी केली. लोकसभेत विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी सांगितले की, जनलोकपाल विधेयक गेल्या 42 वर्षांपासून रखडलेलं आहे. आजपर्यंत आठ वेळा हे विधेयक सादर झाले आहे. आता संसदेने प्रभावी लोकपाल विधेयक तयार करून एक नवा इतिहास रचला पाहिजे. असं मत सुषमा स्वराज यांनी व्यक्त केलं. प्रणव मुखर्जी, सुषमा स्वराज यांच्यानंतर काँग्रेसचे लोकसभा सदस्य संदीप दीक्षित यांनी मत मांडले. दीक्षित म्हणाले की, देशभरात काँग्रेसच्या विरोधात चुकीचे वातावरण निर्माण केले गेले आहे. लोकायुक्तच्या मुद्यावर आपला होकार दर्शवत लोकपालच्या समितीवर सहमती होण्यासाठी जोर दिला आहे. तसेच अण्णांनी उपोषण मागे घ्यावे या विनंतीवर जोर दिला. तसेच लोकपालमध्ये सामाजिक सेवाभावी संस्थाना ही लगाम बसावा अशी सुचना केली. त्यांच्या या सुचनेने लोकसभेत विरोधकांनी एकच आक्षेप घेतला. यावर खुलासा देताना दीक्षित यांनी युक्तीवाद केला. काही एनजीओमुळे सर्व संस्थांचे नाव खराब केले आहे. एनजीओ लोकपालच्या कक्षेत यावे अशी मागणी ही केली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading