जगप्रवास Videos in Marathi

समुद्रावर स्वार 'लाईफ ऑफ सॅन्डी'ची कहाणी

बातम्याJan 1, 2013

समुद्रावर स्वार 'लाईफ ऑफ सॅन्डी'ची कहाणी

01 जानेवारीसॅन्डी रॉक्सन ही 30 वर्षाची ऑस्ट्रेलियन महिला एका छोट्या कयाक होडीतून समुद्रमार्गे जगप्रवासाला निघालीय. भारतातल्या प्रवासादरम्यान नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ती दापोलीजवळाच्या हर्णे किनार्‍यावर येऊन दाखल झालीय. सॅन्डीनं आत्तापर्यंत 55 हजार किलोमीटरचा धाडसी सागरी प्रवास एकटीनं पार पाडलाय. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, सैबेरिया, तुर्कस्थान अशा अनेक देशांना पार करत सुरू झालेला तिचा प्रवास कोलंबोला संपणार आहे. सहा महिने नोकरी आणि मिळालेल्या पैशातून उरलेले सहा महिने जगप्रवास असा तिचा कार्यक्रम आहे. मात्र भारतात दाखल झाल्यावर सागरी सुरक्षेमुळे भारतीय अधिकार्‍यांकडून त्रास झाला असला तरी इथल्या मच्छीमारांचं चांगलं सहकार्य मिळाल्याचं सॅन्डीनं सांगितलंय. ऑस्कर बेन या ऑस्ट्रेलियाच्याच व्यक्तीनं केलेला कयाक होडीतून सागरी जगप्रवासाचा विक्रम सॅन्डिला मोडायचा आहे.