#जकार्ता

VIDEO : जिन्सन जॉन्सनने केरळमधील पुरग्रस्तांना समर्पित केलं सुवर्णपदक

व्हिडिओAug 30, 2018

VIDEO : जिन्सन जॉन्सनने केरळमधील पुरग्रस्तांना समर्पित केलं सुवर्णपदक

जकार्ता, 30 ऑगस्ट : जिन्सन जॉन्सननं 1500 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं आहे. याआधी त्यानं 800 मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावलं होतं. आज झालेल्या १५०० मीटरच्या स्पर्धेत जिन्सनने ३:४४:७२ वेळेत हे पदक आपल्या नावे केले. अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताचे आजचे आठवे सुवर्णपदक आहे. न्यूज18 लोकमतशी बोलताना हे सुवर्णपदक केरळमधील पुरग्रस्तांना समर्पित करत असल्याचं तो म्हणाला. यापूर्वी नीरज चोप्रा (गोळाफेक), तजिंदरसिंग तूर (शॉटपूट), मनजीत सिंग (८०० मीटर शर्यत) , अरपिंदर सिंग ( तिहेरी उडी), स्वप्ना बर्मन ( हप्टेथलॉन) यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.