#छगन भुजबळ

Showing of 40 - 53 from 515 results
'कश्ती तो उनकी डूबती है..,'भुजबळांची शेरोशायरी

व्हिडिओJul 21, 2018

'कश्ती तो उनकी डूबती है..,'भुजबळांची शेरोशायरी

सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव असून मागासवर्गीयांच्या जागा कमी केल्या जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय. यावेळी भुजबळ यांनी शेरोशायरी करून टोलेबाजी केली. मुंबईतील चेंबूरमधील नालंदा सभागृहातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी भुजबळांनी चांगलीच टोलेबाजी केली. काही जण सगळ्यांना त्रास देतात. पण जे त्रास देताच त्यांचा आपण मुकाबला केला पाहिजे. त्यांना असं वाटतं जे त्रास देतील आणि हे सहन करतील असं अजिबात होणार नाही. 'कश्ती तो उनकी डूबती है, जिनके इमान डगमगाते है, जिनके दिल में नेकी होती है, उनके आगे मंजली भी सर झुकाती है' असा शेरोशायरी भुजबळांनी केली. तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक प्रश्नावर आंदोलन करतात. मात्र, आपले कार्यकर्ते आदेश मागत असल्याच्या कानपिचक्या भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिल्या. शिवाय लोकसभेत राहुल गांधींनी मोदींना दिलेल्या झप्पीवरून छगन भुजबळ यांनी टोला हाणलाय.

Live TV

News18 Lokmat
close