#चंद्रशेखर राव

Showing of 66 - 74 from 74 results
तेलंगणात धुमश्चक्री सुरूच

बातम्याJul 6, 2011

तेलंगणात धुमश्चक्री सुरूच

06 जुलैस्वतंत्र तेलंगणा राज्यावरुन आध्रांत वातावरण पेटलेले आहे. स्वतंत्र राज्याच्या निमिर्तीसाठी टिआरएसने 48 तासाचा बंद पुकारला आहे. या बंदचा आजचा दुसरा दिवस आहे आणि हैदराबादसह तेलंगण प्रांतातील जनजीवन या बंदमुळे ठप्प झालं आहे. उस्मानिया विद्यापीठात दगडफेकीच्या घटना सुरु आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागत आहे. कालही विद्यापीठ परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. टिआरएसचे अध्यक्ष चंद्रशेखर राव आणि विजयाशांती यांनी आपल्या खासदारकीचे राजीनामे काल लोकसभा अध्यक्षांना फॅक्सद्वारे पाठवून दिले. तर टिडीपीच्या नागेश्वर राव आणि रमेश राठोड या खासदारांनीही आपआपले राजीनामे दिले आहेत.दरम्यान काल प्रणव मुखर्जी यांनी उशीरा रात्री तेलंगणा नेत्यांशी चर्चा केली. आध्रंप्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची कोणतीही योजना केंद्र सरकारची नसल्याचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.