चंद्रपूर Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 115 results
VIDEO: लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा : राज्यात 'या' 7 मतदारसंघात होणार मतदान

महाराष्ट्रApr 10, 2019

VIDEO: लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा : राज्यात 'या' 7 मतदारसंघात होणार मतदान

नागपूर, 10 एप्रिल : पूर्व विदर्भातल्या 7 लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी सगळी ताकद पणाला लावली. आता उद्याच्या मतदानाकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे. सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार असून त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. पहिल्या टप्प्यात 18 राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील मिळून 91 मतदारसंघांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशिम, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांत मतदान होणार आहे. विदर्भात 14 हजार 189 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीमधील 500 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे.