गौतम गंभीर

Showing of 235 - 248 from 255 results
आयसीसी ऍवॉर्डचे नॉमिनेशन्स जाहीर

बातम्याSep 2, 2009

आयसीसी ऍवॉर्डचे नॉमिनेशन्स जाहीर

2सप्टेंबरक्रिकेटमधील ऑस्कर ऍवॉर्ड समजल्या जाणार्‍या आयसीसी ऍवॉर्डचे नॉमिनेशन्स जाहीर करण्यात आले आहेत. एकूण आठ विभागात भारताला 11 नॉमिनेशन्स मिळाली आहेत. भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीला सर्वाधिक 3 नॉमिनेशन्स मिळाली आहेत. वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम टेस्ट आणि वन डे प्लेअर अशा तीन विभागांत धोणीला नॉमिनेशन्स मिळाली आहेत. भारताच्या गौतम गंभीर आणि हरभजनलाही वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळालं आहे. तसेच या दोघांसहीत व्ही.व्ही.एस.लक्ष्मणला वर्षातील सर्वोत्तम टेस्ट प्लेअरसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवागला वन डेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी तर झहीर खानला टी 20 तील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. अमित मिश्रानं उदयोन्मुख खेळाडूसाठी तर मिथाली राजनं सर्वोत्तम महिला खेळाडूसाठी नॉमिनेशन पटकावलंय. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 1 ऑक्टोबरला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. पुरस्कारांचं हे सहावं वर्ष आहे.