#गोवा

Showing of 66 - 79 from 868 results
VIDEO: प्रवासातलं विघ्न दूर कर रे बाप्पा! भक्तांची गणरायाकडे प्रार्थना

Sep 1, 2019

VIDEO: प्रवासातलं विघ्न दूर कर रे बाप्पा! भक्तांची गणरायाकडे प्रार्थना

मुंबई, 01 सप्टेंबर: कांजूरमार्ग ते भांडुप स्थानाकादरम्यान जलद मार्गावर रुळला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरून ठाण्याकडे वळवण्यात आली आहे. तर दुसरीकडे विघ्नहर्ताच्या स्वागतासाठी गावी जाणाऱ्यांच्या रस्त्यांत विघ्नं आड येतं आहे. कारण एकीकडे मुंबई गोवा हायवेवर प्रचंड ट्रॅफिक जाम झालं आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खड्ड्यांनी आधीच प्रवासी हैराण झालेत. अक्षरश: तास न् तास या प्रवासाला लागत आहेत. तर दुसरीकडे कोकणात जाणाऱ्या ट्रेनही उशिरानं धावत आहेत.