News18 Lokmat

#गोवा

Showing of 677 - 690 from 786 results
आज फैसला सत्तेचा

बातम्याMar 6, 2012

आज फैसला सत्तेचा

06 मार्चपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. उत्तरप्रदेश,पंजाब आणि उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये आज आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. तर तासाभरात पहिला निकाल अपेक्षित आहे. दुपारी तीन वाजेपर्यंंत या पाचही राज्यांमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. उत्तरप्रदेशात 403, पंजाबमध्ये 117 उत्तराखंडमध्ये 70, मणिपूरमध्ये 60 तर गोव्यात 40 जागांसाठी मतमोजणी होणार आहे.आयबीएन नेटवर्क आणि द वीक च्या सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार उ.प्रदेशमध्ये सायकल सुसाटएकूण जागा - 403- सपा - 232 ते 250- बसपा - 65 ते 79- काँग्रेस+रालोद - 36 ते 44- भाजप - 28 ते 38- इतर - 11 ते 23__________________________पंजाबमध्ये अटीतटीची लढतएकूण जागा - 117 जागाएसआयडी+भाजप - 51 ते 63 जागा काँग्रेस -48 ते 60 जागाइतर - 3 ते 9 जागा __________________________उत्तराखंडमध्ये काँग्रेसला कौलएकूण जागा - 70काँग्रेस - 31 ते 41 जागा भाजप- 22 ते 32 जागा _________________________मणिपूरमध्ये पुन्हा काँग्रेसएकूण जागा - 60 काँग्रेस - 24 ते 32 जागापीडीएफ - 5 ते 11 जागाटीएमसी - 7 ते 13 जागाइतर - 10 ते 18 जागागोयचें धूमशान- मुख्य लढाई काँग्रेस आणि भाजपमध्ये - तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये बंडखोरी- सत्ताधार्‍यांवर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे आरोप- निवडणूक प्रचारात पैशांची 'खाण' - मतदारसंघांच्या फेररचनेचा फायदा भाजपला?- भाजपनं प्रथमच दिली ख्रिश्चनांना उमेदवारी- भाजपची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती- एकूण 215 उमेदवारांमध्ये महिला केवळ 9- निवडून येणार्‍या अपक्षांवर मायनिंग लॉबीचं लक्ष