गॅस सिलेंडर Videos in Marathi

पालघरमध्ये सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा स्फोट; पहा थरारक VIDEO

व्हिडीओJan 22, 2019

पालघरमध्ये सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा स्फोट; पहा थरारक VIDEO

पालघर, 22 जानेवारी : डहाणूतून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावर उलटताच ट्रकने पेट घेतला. यात ट्रक चालकाचा मृत्यू झालाय. तर क्लिनर गंभीर जखमी झालाय. या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडे जाणारी वाहतूक दुपारी 2 तास ठप्प झाली होती. दुपारी साडे तीन वाजता गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकवरचा चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक उलटला. ट्रक रस्त्यावर उलटताच ट्रकने पेट घेतला. त्यातल्या गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला.