#गुजरात

Showing of 1210 - 1223 from 1248 results
राष्ट्रवादीची दिल्लीत बैठक - जागा वाटपाचा घोळ कायम

बातम्याMar 7, 2009

राष्ट्रवादीची दिल्लीत बैठक - जागा वाटपाचा घोळ कायम

6 मार्च , नवी दिल्ली आशिष दीक्षित काँग्रेस आणि राष्टवादीच्या जागावाटपचा तिढा अजुनही पुरता सुटला नाहीय 7 ते 8 जागांबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आज दिल्लीत अंतर्गत बैठका घेतल्यात. काँग्रेसची बैठक सोनीया गांधींच्या घरी झाली. या बैठकीला विलासराव देशमुख, ए.के.ऍन्टोनी, सुशीलकुमार शिंदे ,मुख्यमंत्री अशोक चव्हाण,प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित आहेत. राष्ट्रवादीबरोबरचा जागावाटपाचा तीढा सोडवण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येतेय. त्या अगोदर थोड्यावेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचीही दिल्लीत बैठक झाले. यावेळी राष्ट्रवादीनं महाराष्ट्राबाहेर गुजरात आणि गोव्यामध्ये जागा मागितल्याचं समजतं.सुरुवातीला राष्ट्रवादीनं 24 - 24 ची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी 25 - 23 वर आले आहेत. सोनिया गांधी गेल्या दोन दिवासांपासून घटक पक्ष, मित्र पक्षांची भेट घेत आहेत. त्यापैकी शरद पवार आणि अजून काहीजण शिल्लक आहेत. आजच शरद पवार आणि सोनिया गांधीची भेट होण्याची दाट शक्यता आहे. जोपर्यंत जागावाटपांचा फॉर्म्युला निश्चित होत नाही तोपर्यंत शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट होणं अशक्य आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची अंतिम चर्चा उद्यापासून दिल्लीत सुरू होणार आहे. या चर्चेनंतरच जागावाटपाबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल. पन्नास टक्के जागा मिळाव्यात या मागणीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव झाला होता. मुंबईत झालेल्या चर्चेच्या फेर्‍यानंतर दोघांनीही लवचिक भूमिका घेतली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीनं 24 - 24 ची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी 25 - 23 वर आले आहेत. सोनिया गांधी गेल्या दोन दिवासांपासून घटक पक्ष, मित्र पक्षांची भेट घेत आहेत. त्यापैकी शरद पवार आणि अजून काहीजण शिल्लक आहेत. आजच शरद पवार आणि सोनिया गांधीची भेट होण्याची दाट शक्यता आहे. जोपर्यंत जागावाटपांचा फॉर्म्युला निश्चित होत नाही तोपर्यंत शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट होणं अशक्य आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची अंतिम चर्चा उद्यापासून दिल्लीत सुरू होणार आहे. या चर्चेनंतरच जागावाटपाबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल. पन्नास टक्के जागा मिळाव्यात या मागणीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव झाला होता. मुंबईत झालेल्या चर्चेच्या फेर्‍यानंतर दोघांनीही लवचिक भूमिका घेतली होती.