#गिरीष बापट

Showing of 1 - 14 from 83 results
'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी

व्हिडिओOct 11, 2018

'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी

राज्यात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पण या घटनांबाबत आपले राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत याची प्रचिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या वक्तव्यामुळं आली आहे. बापट यांना दोन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवर प्रतिक्रिया विचारली होती. या प्रश्नाला उडवून लावत असे भरपूर प्रश्न आहेत असं संतापजनक उत्तर बापटांनी दिलं. तुम्ही आमच्या चांगल्या कामांना प्रसिद्धी देत जा असं बोलून ते तिथून निघून गेले. गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी संवेदनशील उत्तर देणं अपेक्षित होतं पण बापटांच्या या वक्तव्यामुळे स्त्रियांच्या भावना दुखावल्या गेल्या इतकं नक्की.

Live TV

News18 Lokmat
close