#गिरगाव

Showing of 105 - 106 from 106 results
मनसेचा महामोर्चा

बातम्याAug 21, 2012

मनसेचा महामोर्चा

11 ऑगस्टमनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही राज ठाकरेंनी मोर्चा काढला. या मोर्चात साठ ते सत्तर हजारांवर लोक सहभागी झाले. राज ठाकरेंच्या भाषणानं पोलीसही प्रभावित झाले. एका पोलिसानं स्टेजवर जाऊन राज ठाकरेंना गुलाब दिला. पण सभेनंतर त्या पोलिसाला ताब्यात घेण्यात आलं. या मोर्चाला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे सरकारच नाही, तर शिवसेना भाजपचेही धाबे दणाणलेत. राज ठाकरे दुपारी सव्वा वाजता आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजातून निघाले. ते मनसेच्या पहिल्या वहिल्या मोर्चात सहभागी व्हायला. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही.. ते मोर्चा काढण्यावर ठाम होते. सिद्धिविनायकाचं दर्शन घेतं. दुपारी अडची वाजता ते गिरगाव चौपाटीवर पोहोचले. तोपर्यंत गिरगाव चौपाटीवर अक्षरशः जनसागर उसळला होता. जणू मनसैनिकांची भरतीच आली होती. 11 ऑगस्टच्या दिवशी सीएसटीत झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही लोक.. विशेषतः तरूण आणि महिला मोठ्या संख्येने हजर राहिल्या.याच मुद्द्यावर भाजपने काढलेल्या मोर्चाला अल्प प्रतिसाद मिळाला होता. पण मनसेचा मोर्चा मात्र विराट असाच म्हणावा लागेल. दुपारी अडीच वाजता निघून.. हा 60 ते 70 हजारांचा मोर्चा.. तासाभरात आझाद मैदानात पोहोचला. राज ठाकरेंनी आधी जाऊन दंगलीत नुकसान झालेल्या अमर जवान ज्योतीचं दर्शन घेतलं. आझाद मैादनातही पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. पण यातले अनेक पोलीस हे राज ठाकरेंच्याच बाजूने होते. पोलिसांवर झालेल्या अत्याचाराविरोधात राज ठाकरेंनी आवाज उठवल्यामुळे ते खुष होते. एक पोलीस नाईक तर कारवाईची पर्वा न करता थेट मंचावर पोहोचले आणि त्यांनी राज ठाकरेंना गुलाबाचं फूल दिलं.कायद्याला आव्हान देत राज ठाकरेंनी मोर्चा काढल्यामुळे.. पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता असली. तरी मोर्चा शांततेत काढून आम्ही कायद्याचं पालनच केलंय, असं मनसे नेत्यांचं म्हणणं आहे. कारवाई करायची की नाही, यावरून राज्य सरकार अडचणीत असताना.. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्येही अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे एक मोर्चा काढून राज ठाकरेंनी भविष्याचीच मोर्चेबांधणी केली, असंच म्हणावं लागले.

Live TV

News18 Lokmat
close