मुंबई, 19 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर रेडिओ स्टेशनवर पाकिस्तानी कलाकारांची गाणी वाजवू नये असा इशारा मनसेने दिला होता. या नंतरही काही रेडिओ स्टेशनवर पाकिस्तानी कलाकारांची गाणी वाजवली गेली. याबाबत वांद्र्यातील मनसैनिकांनी संबधित रेडिओ स्टेशन वर धाव घेतली आणि दम दिला. यापुढे पाकिस्तानी गाणी न वाजवण्याचं संबधित रेडिओ स्टेशनने मान्य केलं.