#गळफास

Showing of 404 - 417 from 432 results
दिल्ली गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपीची आत्महत्या

बातम्याMar 11, 2013

दिल्ली गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपीची आत्महत्या

11 मार्चदिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी राम सिंगने आज सकाळी तिहार जेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. स्वत:च्या कपड्यांनी राम सिंगनं गळफास लावून घेतला. पहाटे 5 वाजता 3 नंबरच्या बॅरेकमध्ये त्याचा मृतदेह आढळला. गंभीर बाब म्हणजे रामसिंगला बॅरेकमध्ये इतर 2 कैद्यांबरोबर ठेवण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तिहार जेल प्रशासनाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. एवढ्या महत्वाच्या खटल्यातल्या आरोपीची सुरक्षा व्यवस्था इतकी ढिसाळ कशी होती असा प्रश्न विचारला जात आहे. केसमधला आरोप जेलमध्ये आत्महत्या कसा करू शकतो असा सवाल आता विचारला जावू लागलाय. दिल्लीमध्ये 16 डिसेंबरला ज्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला त्या बसचा राम सिंग ड्रायव्हर होता. घटनेच्या वेळी पीडित तरूणीला सळईने बेदम मारहाण करण्यात आली होती यात राम सिंग सर्वात पुढे होता. दरम्यान, राम सिंगची आत्महत्या नसून हत्या झाली आहे असा आरोप आरोपीच्या वकिलांनी केला आहे. तसंच या घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. राम सिंगवरील आरोपकलम 302 - खूनकलम 376 - सामूहिक बलात्कारकलम 377 - अनैसर्गिक गुन्हाकलम 201 - पुरावा नष्ट करणेकलम 307 - खुनाचा प्रयत्नकलम 365 - अपहरणकलम 396 - खुनासहित दरोडाकलम 394 - जाणीवपूर्वक इजा करणेकलम 395 - दरोडाकलम 120 ब - गुन्हेगारी कट