#गर्भपात

Showing of 92 - 98 from 98 results
डॉ.मुंडेंचं रजिस्ट्रेशन रद्द होणार ?

बातम्याMay 30, 2012

डॉ.मुंडेंचं रजिस्ट्रेशन रद्द होणार ?

30 मेबेकायदेशीरपणे गर्भपात करणारे परळीतले डॉक्टर सुदाम मुंडेच्या मुसक्या आवळ्याची कारवाई आता वेग घेत आहे. डॉ. सुदाम मुंडे यांचं रजिस्ट्रेशन रद्द का करू नये, अशी नोटीस मेडिकल काऊंसिलनं बजावली आहे. यावर पंधरा दिवसात उत्तर देणं बंधनकारक आहे. पण मुंडे यांनी उत्तर दिलं नाही तर त्यांच्या डॉक्टरकीच्या प्रॅक्टीसचा परवाना पाच वर्षांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. इतकंच नाही तर डॉक्टर मुंडे पती-पत्नीविरोधात पोलिसांनीही कारवाई सुरू केली. मुंडे कुटुंबीयांची बँक खाती गोठवण्यात आली आहे. परळी शहराबाहेरच्या इतर बँकांमधले व्यवहारही तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुंडे कुटुंबातल्या व्यक्तींना बँकेतून पैसे काढता येणार नाही. याशिवाय मुंडेच्या जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहारही होऊ नये यासाठी बीडचे उपनिबंधक आणि औरंगाबादच्या आयुक्तांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदेशीरपणे गर्भपात करणार्‍या डॉक्टर मुंडेच्या पाठिशी कोण आहे, याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यामार्फत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. पंधरा दिवसांच्या आत अहवाल द्यावा, अशा सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close