गतिमंद

Showing of 40 - 40 from 40 results
'आदर्श' घडवणारा प्रथमेश दाते ; आदर्श अपंग एंप्लॉयीचा पुरस्कार

बातम्याDec 12, 2010

'आदर्श' घडवणारा प्रथमेश दाते ; आदर्श अपंग एंप्लॉयीचा पुरस्कार

आशिष दीक्षित, नवी दिल्ली12 डिसेंबरजिद्द असेल तर माणूस काय काय करू शकतो याचा प्रत्यय नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात आला. निमित्त होतं अपंग सबलीकरणाच्या राष्ट्रीय पुरस्कारांचं. हे पुरस्कार पटकावणा-या तरुणांच्या कहाण्या थक्क करणा-या होत्या. याप्रसंगी इचलकरंजीच्या प्रथमेश दातेला आदर्श अपंग एंप्लॉयीचा पुरस्कार देण्यात आला. डाऊन सिंड्रोम घेऊन जन्मलेला गतिमंद प्रथमेश अनेक अडथळे पार करत आता स्वतःच्या पायावर उभा आहे. प्रथमेशच्या निरागस हास्यामागे होती एक दुःखाची लकेर.. डाऊन सिंड्रोम घेऊन जन्माला आलेला प्रथमेश जगणार नाही असं डॉक्टरांनी जाहीर केल्यानंतरही त्याच्या आई वडिलांनी मोठ्या जिद्दीने त्याला वाढवला. त्यांची ही जिद्द, मेहनत आता फळाला आली. या वर्षीचा आदर्श अपंग एंप्लॉयीचा पुरस्कार त्याला मिळाला.मोझॅक डाऊन सिंड्रोम असल्यामुळे प्रथमेशची शारीरिक आणि बौद्धिक वाढ इतरांपेक्षा हळू होती. त्यामुळे लोक कुजबूज करू लागले. नावं ठेवू लागले. पण अशा वेळी अजिबात निराश न होता. त्याच्या आई-वडिलांनी निश्चय केला की प्रथमेशला ते सर्व काही शिकवायचे जे त्याच्या वयाचे इतर मुलं शिकतात. हे शिकणं प्रथमेशसाठी फार कठीण होतं. पण इच्छाशक्तीच्या बळावर त्यानं आपल्या जन्मजात अवगुणांवर मात केली. दहावी नापास झाल्यावर त्याने स्वतःहून टायपिंग आणि कंप्यूटरचं शिक्षण घेतलं. लायब्ररियन म्हणून नोकरी मिळवताना याच सर्व गोष्टी त्याच्या मदतीला आल्या. गेल्या तेवीस वर्षांचा प्रवास प्रथमेशच्या आई वडिलांसाठी खडतर होता. पण ज्या मुलामुळे लोकांनी त्यांना नावं ठेवली. त्याच मुलामुळे आज त्यांची वाहवाही होते. प्रथमेश आता स्वतःच्या पायांवर उभा आहे.त्याच्यासारख्या इतर मुलांसाठी त्याने एक आदर्श घडवला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading