गणेश चतुर्थी

Showing of 27 - 27 from 27 results
कॉमनवेल्थ बॅटन मुंबईत

बातम्याSep 10, 2010

कॉमनवेल्थ बॅटन मुंबईत

10 सप्टेंबर दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सची बॅटन आज मुंबईत दाखल झाली. पुण्याहून सकाळी साडेआठ वाजता निघालेली बॅटन पनवेलमध्ये पोहचली. यानंतर बॅटन करंजा इथून बोटीने सकाळी 10 वाजता लायन गेट इथे दाखल झाली. इथे बॅटनचे जंगी स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच बॅटनने आयएएनएस विराटवरुनही प्रवास केला. यानंतर दुपारी 12 वाजता दिग्गजांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडियावर बॅटनचे जोरदार स्वागत झाले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे खासदार गुरुदास कामत या राजकीय नेत्यांसोबतच ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, भाग्यश्री ठिपसे, कमलेश मेहता असे क्रीडाक्षेत्रातले नामांकीत खेळाडूही बॅटनच्या स्वागताला हजर होते. विविध खेळांतील अर्जुन आणि छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू बॅटन रिलेमध्ये सहभागी झाले होते. आज रमझान ईद आणि शनिवारी गणेश चतुर्थी असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव बॅटनचा प्रवास मुंबईतील काही भागातच होणार आहे. संध्याकाळी बॅटन आरे कॉलनी येथील न्यूझीलंड हॉस्टेलमध्ये थांबेल. इथेही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या बॅटन सिल्वासाला रवाना होईल.

ताज्या बातम्या