शोधा राज्य/ मतदार संघ

#गणेशोत्सव

Showing of 313 - 323 from 323 results
राज्यावर'बंद'चं 'विघ्न' टळलं

बातम्याSep 20, 2012

राज्यावर'बंद'चं 'विघ्न' टळलं

20 सप्टेंबरएनडीए आणि डाव्या पक्षांनी आज एफडीआय आणि महागाईविरोधात बंद पुकारला. या बंदला व्यापार्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला आणि मुंबई वगळता राज्यात बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. या भारत बंदला राज्यात समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. एकूणच बंदचं विघ्न टळलं आहेएफडीआय आणि महागाईविरोधात एनडीए आणि डाव्या पक्षांनी आज भारत बंद पुकारला. मुंबईत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. मंत्रालयाला कुलूप घालणार्‍या भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केली. मुंबईत गणेशोत्सवामुळे बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.पण आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणार्‍या नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये बंदचा मोठा परिणाम दिसला. या बंदमध्ये एपीएमसीच्या सर्व व्यापार्‍यांनी सहभाग घेतल्यामुळे ऐन गणेशोत्सव आणि गौरी पुजनाच्या काळात भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.तिकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातही या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा पुतळा जाळला. औरंगाबादमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापुरातही दुकानं बंद ठेऊन व्यापार्‍यांनी सरकारचा निषेध केला.पण पुण्यात मात्र या बंदला समीश्र प्रतिसाद मिळाला. नाशिकमध्ये मात्र भारत बंदचा पुरता फज्जा उडाला. बंद करून महागाई कमी होणार का असा सवाल नाशिकरांनी विचारला. एकूणच या बंदच्या निमित्तानं राज्यात एफडीआयला व्यापार्‍यांचा मोठा विरोध असल्याचं स्पष्टपणे समोर आलंय. आता महाराष्ट्र सरकार राज्यात एफडीआयबाबत काय भूमिका घेतं हे पहाणं महत्वाचं ठरतंय.

Live TV

News18 Lokmat
close