#गणपती बाप्पा

Showing of 482 - 491 from 491 results
'देवा धाव रे...',तिकीटासाठी पाव रे !

बातम्याJan 11, 2012

'देवा धाव रे...',तिकीटासाठी पाव रे !

11 जानेवारीपक्षातील वरिष्ठांकडे नंबर लागत नाही म्हटल्यावर अनेक इच्छुक उमेदवारांनी आता चक्क गणपती बाप्पा आणि साईबाबांनाच साकडं घातलं आहे. नागपुरात सुरु असलेल्या निवडणूक धामधुमीत ही घटना घडली आहे. तिथल्या गणेश आणि साईमंदिरातल्या दानपेटीत पुजार्‍यांना सोनं-चांदी आणि पैशांबरोबरच चक्क उमेदवारी अर्ज सापडले आहे. आश्चर्यचकित झालेल्या पुजार्‍यांनी नीट पाहिलं, तर ते चक्क काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठीचे अर्ज होती. ''ज्यांची अमानत त्याला परत करावी'' , या भावनेनं मग पुजार्‍यांनी या फॉर्मसाठी मग काँग्रेसच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. काँग्रेस शहराध्यक्षांनी हे फॉर्म मागवून घेतले आणि बाप्पा आणि साईबाबांकडून वशिला लावायचा प्रयत्न करणार्‍या या इच्छुकांचे अर्जही विचारात घेतले जातील असं मिश्किलीनं सांगितलं.