#खून

Showing of 1262 - 1275 from 1283 results
चिरमुरडीवर बलात्कार करणा-या रवींद्र कांबळेला फाशीची शिक्षा

बातम्याMar 5, 2009

चिरमुरडीवर बलात्कार करणा-या रवींद्र कांबळेला फाशीची शिक्षा

5 मार्च, कोल्हापूर पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन खून करणार्‍या बाबू उर्फ रवीन्द्र कांबळे याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. 24 ऑक्टोबर 2007 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील्या नेर्ली इथं राहणार्‍या पाच वर्षाच्या छकुली कांबळे हिला बाबू उर्फ रवीन्द्र कांबळे यानं चाकलेट देतो असं सांगून अपहरण केलं. त्यानंतर ओढ्याकाठी नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला.त्यानंतर तिचा निर्घृण खून केला. या खटल्याची अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए.बी.महाजन यांच्यासमोर सुनावणी झाली.त्यावेळी त्यांनी एकूण 23 साक्षीदार तपासले आणि आरोपीला मरेपर्यंत फाशी बलात्कार केला म्हणून दहा वर्षं शिक्षा आणि अपहरण केलं म्हणून 3 वर्षं शिक्षा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून 3 वर्षे शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे वकील म्हणून अशोक रणदिवे यांनी काम पाहिलं.