#खिशातील

VIDEO : खिशात मोबाईलचा स्फोट, थोडक्यात बचावला तरुण

व्हिडिओMar 2, 2019

VIDEO : खिशात मोबाईलचा स्फोट, थोडक्यात बचावला तरुण

मनोज कुलकर्णी, 02 मार्च : मुंबईच्या सकिनाका खैराणी रोड येथील रॉयल फेब्रिकेशन या कारखान्यात एक कामगाराच्या खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना या कारखान्यात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 28 फेब्रुवारीला अब्दुल रौफ हा कामगार इतर कामगारांसोबत सकाळी 10 वाजेच्या दरम्यान बसलेला असताना अचानक त्याच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईलने पेट घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्वरित हा मोबाईल खिशातून काढून जमिनीवर फेकला. सुदैवाने यात त्याला गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, पुन्हा एकदा मोबाइलच्या अचानक घेतलेल्या पेटने चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे.