मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरात महिनाभर राहिल्यावर गेल्या आठवड्यात बाहेर पडली. दर आठवड्याला बिग बॉसने दिलेल्या टास्कचं आव्हान स्वीकारत नेहाने ४ आठवडे या कार्यक्रमात लढत दिली. बिग बॉसच्या घरामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चालायचं त्याला नेहा हुशारीने सामोरी गेली. नेहाच्या याच चिकाटीमुळे बिग बॉसच्या घरात पुन्हा प्रवेश करायला तिला आवडेल असं तिने मुलाखतीत स्पष्ट केलं. न्यूज18 लोकमतच्या नीलिमा कुलकर्णी यांनी घेतलेली ही खास मुलाखत