#खडसे

Showing of 27 - 40 from 231 results
एका पक्षाने उडवली एकनाथ खडसेंची झोप

बातम्याJul 14, 2018

एका पक्षाने उडवली एकनाथ खडसेंची झोप

राजकीय जीवनात एकनाथराव खडसे यांनी अनेकांची झोप मोडली आहे मात्र त्यांची झोप एका पक्षाने मोडली आहे. ग्रे हॉर्नबिल ह्या नावाच्या पक्षाने गेल्या दोन महिन्यापासून एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या फॉर्म वरती मुक्काम आहे. रोज सकाळी सहा वाजता खडसेंच्या बेडरूमच्या खिडकी टोच मारून आवाज करून त्यांची झोप मोडतो मात्र त्यांना याचा आनंदही होत आहे. गेल्या सात ते आठ महिन्यापासून हे दोन पक्षी आले आहे. हे दोघेही अनोखे पक्षी असून मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलंय. या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी पहाटे साडेपाच सहाला माझ्या बेडरूमच्या खिडकीवर येतो आणि चोचीने खिडकीवर टकटक करतो. या पक्षाचा आवाज इतका मोठा आहे की आपली इच्छा असो अथवा नसो तुम्हाला उठावंच लागतं अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली.