खडसे

Showing of 1093 - 1106 from 1148 results
पवारांचा 'भार' कमी होणार

बातम्याJul 6, 2010

पवारांचा 'भार' कमी होणार

6 जुलैकेंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सोमवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली. आणि त्यांच्याकडे असलेल्या तीनपैकी एका मंत्रीपदाची जबाबदारी काढून घेण्याची मागणी केली. पक्षाकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला वेळ मिळावा यासाठी, आपल्यावरचा भार कमी करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे पवारांकडील अन्न व नागरीपुरवठा खाते काढले जाण्याची शक्यता आहे. पण पवारांच्या या मागणीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. प्रफुल्ल पटेलांना कॅबिनेटमंत्री करण्यासाठी पवारांची ही खेळी असल्याची दिल्लीत चर्चा आहे.महागाईपासून पळ?इंधन दरवाढीमुळे वस्तूंच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी येत्या पावसाळी अधिवेशनात महागाईच्या प्रश्नावर विरोधक रान उठवणार, हे निश्चित. त्यामुळेच पुन्हा विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याची शरद पवारांची इच्छा नाही. म्हणूनच शरद पवारांनी आपल्याकडील एखाद-दुसर्‍या खात्याचा कार्यभार हलका करण्याची मागणी केली आहे. खरे तर काँग्रेसला शरद पवारांकडील अन्न व नागरी पुरवठा खाते काढून घ्यायचे आहे. तशी मागणी यापूर्वीच काँग्रेसने पवारांना केली होती. त्यामुळे या खात्याच्या बदल्यात शरद पवारांना आणखी काय हवे आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. हे तर्कवितर्क काय आहेत ते पाहूयात...पवारांकडील खाते काँग्रेस स्वत:कडे घेणारपवारांकडील 'भार' प्रफुल्ल पटेलांकडेप्रफुल्ल पटेलांना बढती मिळण्याची शक्यताराष्ट्रवादीला मिळणार आणखी एक राज्यमंत्रीपदराज्यमंत्रीपदी सुप्रिया सुळेंची वर्णी लागण्याची शक्यताकृषी मंत्रालयाचे विभाजन करण्याचा काँग्रेसचा विचारखरेच पवारांच्या मनात काय आहे, हे जाणणे कोण्या सोम्या-गोम्याचे काम नाही. त्यामुळेच विरोधकांनाही पवारांच्या मागणीत मोठ्या राजकीय खेळीची शंका येत आहे.महागाईच्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे, हे दाखवण्याचा काँग्रेस पुरेपूर प्रयत्न करेल. त्यामुळंच ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर पवारांकडचं अन्न व नागरी पुरवठा खाते काढून विरोधकांच्या टीकेची धार बोथट करण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. 'पवारांसाठी क्रिकेट खाते काढा'शरद पवारांसाठी क्रिकेटमंत्री असे खाते काढा, अशी उपहासात्मक टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. पवार कृषी खाते सोडून क्रिकेटवरचे जास्त लक्ष देत असल्याची टीकाही त्यांनी केली.शरद पवार हे प्रफुल पटेल यांना कॅबिनेटचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading