#खडसे

Showing of 989 - 1002 from 1059 results
पिकांच्या नुकसानीचा आढावा घेणार - मुख्यमंत्री

बातम्याNov 30, 2010

पिकांच्या नुकसानीचा आढावा घेणार - मुख्यमंत्री

30 नोव्हेंबरहिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेणार असं आश्‍वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. तसेच नागपूरच्या मिहान प्रकल्पाला गती देण्यात येईल अशी हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या हिवाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल. तर अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान या महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे. राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्यांवर सभागृहामध्ये चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.