#खडसे

Showing of 66 - 79 from 923 results
SPECIAL REPORT : सेना-भाजपामध्ये आयाराम तुपाशी, निष्ठावंत मात्र उपाशी

Jun 16, 2019

SPECIAL REPORT : सेना-भाजपामध्ये आयाराम तुपाशी, निष्ठावंत मात्र उपाशी

मुंबई, 16 जून - फडणवीस सरकारचा बहचर्चित आणि बहुप्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवार पार पडला. भाजप आणि संघपरिवारात खरंतर आयारामांना लगेच मंत्रीपद देण्याची परंपरा नाही. पण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाचं बक्षिस देऊन मुख्यमंत्र्यांनी भाजपातील निष्ठावंतांसह विरोधकांनाही मोठा धक्का दिला. तर सेनेतही बाहेरच्यांना मंत्रिपदांची खैरात वाटून निष्ठावंताना पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता वाटल्या. यामुळे निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी उफाळून आली असून, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तर पुन्हा एकदा त्यांच्या मनातली खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. पाहा यासंदर्भातला न्यूज18 लोकमतचा विशेष रिपोर्ट.