खटला

Showing of 690 - 703 from 785 results
येडीयुरप्पांच्या विरोधात खटला चालवायला राज्यपालांची मंजुरी

बातम्याJan 21, 2011

येडीयुरप्पांच्या विरोधात खटला चालवायला राज्यपालांची मंजुरी

21 जानेवारीकर्नाटकात राज्यपाल हंसराज भारद्वाज आणि मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्यातला संघर्ष चिघळला. भूखंड घोटाळ्याप्रकरणी येडीयुरप्पा आणि गृहमंत्री के अशोक यांच्याविरोधात खटला चालवायला भारद्वाज यांनी मंजुरी दिली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याविरोधात खटला चालवण्याची प्रक्रिया राज्यपालांनी थांबवावी अशी शिफारस करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं गुरुवारच्या बैठकीत घेतला होता. पण मंत्रिमंडळाचा हा निर्णय बेकायदेशीर आहे. आणि राज्याच्या खटल्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा अधिकार आपल्याला असल्याचं भारद्वाज यांनी म्हटलं आहे. तर राज्यपालांची कारवाई चुकीची असून त्यांनी विनाअट माफी मागावी अशी मागणी येडीयुरप्पा यांनी केली.