#खटला

Showing of 651 - 664 from 718 results
कसाबचा आज फैसला

बातम्याMay 3, 2010

कसाबचा आज फैसला

3 मेदेशाला हादरवणार्‍या मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याच्या ऐतिहासिक खटल्याचा आज निकाल आहे. या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याला काय शिक्षा मिळणार याची सर्वत्र उत्सुकता आहे. स्पेशल कोर्टाने निकालपत्र वाचनाला सुरुवात केली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, कसाबचे वकील के. पी. पवार, सबाउद्दीनचे वकील कोर्टात हजर आहेत. खटल्यातील महत्त्वाचा आरोपी अजमल कसाबला कोर्टापुढे हजर करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश तहलीयानी काय निकाल देतात, याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 14 एप्रिल 2009 ला या खटल्याची सुरूवात झाली आणि वर्षभराच्या आत 31 मार्च 2010 ला खटल्याचा अंतिम युक्तीवादही संपला. एवढ्या मोठ्या हल्ल्याचा खटला वर्षभराच्या आत संपला, हे विशेष आहे.या खटल्यातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे...मुंबईवर एकूण 9 पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला होतात्यातले आठ अतिरेकी मारले गेले तर कसाब एकमेव अतिरेकी जिवंत सापडलाया हल्ल्यात मदत केल्याच्या आरोपाखाली सबाउद्दीन आणि फहीम अन्सारी यांनाही अटक करण्यात आलीआता पाहूया देशाचे हे गुन्हेगार कोण आहेत ते.....अजमल कसाब, एकमेव जिवंत अतिरेकीबडा अब्दुल रेहमान, ताज हॉटेलअबू अली, ताज हॉटेलअब्दुल रेहमान छोटा, ओबेरॉय हॉटेलफहाद उल्ला, ओबेरॉय हॉटेलनासीर ऊर्फ अबू उमेर, नरीमन हाऊसबाबर इमरान ऊर्फ अबू अकाशा, नरीमन हाऊसइस्माईल खान, सीएसटीअबू शोएब, ताज हॉटेलफहीम अन्सारी, कटात मदत केल्याचा आरोपसबाऊद्दीन, कटात मदत केल्याचा आरोप