#क्षेपणास्त्र

Showing of 1 - 14 from 27 results
VIDEO : भारतीय वायूदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, साद्य केली ही किमया

व्हिडिओSep 8, 2018

VIDEO : भारतीय वायूदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, साद्य केली ही किमया

भारतीय हवाई दलाची मान अभिमानानं उंचावणारी ही बातमी आहे. लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला. IL-78 MKI tanker या इंधन असलेल्या विमानातून 'तेजस' या लढाऊ विमानात हवेतच इंधन भरण्यात आलं. हा चित्तथरारक व्हीडिओ हवाई दलानं जारी केलाय. भारतीय वायूदलातील 'तेजस' या लढाऊ विमानाची प्रवास क्षमता 250 ते 300 किलोमीटर आहे. तेजसमधील इंजिन हे अमेरिकेचे, रडार-क्षेपणास्त्र इस्रायलचे तर आसनव्यवस्था ब्रिटनमध्ये निर्मित आहेत. केवळ 460 मीटरच्या धावपट्टीवरून हे लढाऊ विमान टेक ऑफ करू शकतं. 'तेजस' हे विमान सुखोई-30-एमकेआय, जग्वार, मिराज-2000 च्या श्रेणीतले आहे. 50 हजार फुटाच्या उंचीपर्यंत उड्डाण भरण्याची 'तेजस' लढाऊ विमानात क्षमता आहे. हवेतून-हवेत आणि हवेतून-जमिनीवर क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता 'तेजस'मध्ये आहे. नौकाविरोधी क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि अग्निबाण देखील या विमानातून डागता येतात.

Live TV

News18 Lokmat
close