#कोल्हापूर

Showing of 1002 - 1015 from 1023 results
जालना येथील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

बातम्याMay 14, 2013

जालना येथील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

02 मार्चफक्त तीन सभा घेतल्या तर एवढी मिर्ची झोंबली. मग तालुक्या-तालुक्यात सभा घेऊ तेंव्हा काय करणार ? बावचळलंय कोण ? आणि विचारताय कोणाला ? माझ्या ताफ्यावर दगडफेक कोण करतंय ? हे विसरू नका तुम्हीही रस्त्यावरून फिरतात. आमच्याकडूनही दगड येऊ शकतो. जशाच तसे उत्तर देण्यास मीही तयार आहे. गृहखाते,पोलीस बाजूला करा आणि मग लढा, दोन पायांवर सुद्धा परत जाऊ देणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा सत्तेचा, पैशांचा नुसता माज चढलाय हा माज उतरावा लागेल असं सणसणीत उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांना दिलंय. तसंच 7 तारखेला मी पुण्यात येणार आहे. राष्ट्रवादीने अडवूनच दाखवावं असं जाहीर आव्हानही राज यांनी दिलं. त्याचबरोबर राज्यात सिंचन प्रकल्पांवर कोट्यावधी पैसा खर्च केला तर हा दुष्काळ सरकारनिर्मित आहे की निसर्गनिर्मित आहे ? धरणं उभी कशी राहिली नाही ? पैसा गेला कुठे ? दुष्काळ असताना आयपीएलच्या मॅच बंद करणार आहे का ? असा थेट सवाल राज यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना विचारलाय. जालन्यात झालेल्या विराट सभेत राज ठाकरे यांनी चौफेर तोफ डागली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, भास्कर जाधव, अंकुश काकडे यांच्यावर सडकून टीकाही केली.आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौर्‍याच्या दुसर्‍या टप्प्याला मराठवाड्यातून सुरूवात झाली. आज जालन्यात झालेल्या विराट सभेत राज ठाकरे यांनी चौफर तोफ डागली. अजित पवार म्हणे मी बावचळलोय...काहीही बोलतो. अरे मी फक्त कोल्हापूर,सोलापूर,रत्नागिरी येथे फक्त सभा घेतल्या तर एवढी मिर्ची लागली. माझ्या ताफ्यावर दगडफेक करतात. जालन्यात सभा लोकांना पाहता यावी नाही म्हणून केबलचे प्रक्षेपण बंद पाडले. मग कोणं बिथरलंय ? हे विसरू नका कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. सोलापुरात काय वाईट बोललो ? तुम्हाला अख्खा महाराष्ट्र शिव्या घालत आहे. हीच भाषा तुमच्यासाठी आहे. माझ्या वाट्याला जाऊ नका. मला काळे झेंडे दाखवले तर त्याचे लाल बावटे होण्यास वेळ लागणार नाही. आणि हेही विसरू नका. राज्यात तुम्हीही फिरतात दगड आमच्याकडूनही येऊ शकतो. तुमच्याकडे जर प्रस्तापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहे. हे विस्थापित काय करतील याचा नेम नाही. तुम्ही जर जशाच तसे उत्तर देण्याची भाषा करत असाला तर आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. एवढाच जर माज आलाय ना तर गृहखाते,पोलीस बाजूला करा आणि या लढायला मग पाहा दोन पायांवर परत जाऊ देणार नाही असं जाहीर आव्हान राज ठाकरे यांनी अजित पवारांना दिलं. तसंच सभ्यतेची भाषा आम्ही जाणतो. पण आज राज्याची जनता दुष्काळाने होरपाळून निघत आहे. प्यायला पाणी नाही. जनावर पाण्यावाचून तडफडून मरत आहे. याची लाडज वाटत नाही का ? आमची नाशिकमध्ये वर्षभराची सत्ता आहे. आम्हाला विचारतात काय केलं नाशिकमध्ये ? तुम्ही 14 वर्ष जो महाराष्ट्रावर बलात्कार केलाय त्याची उत्तर कोणी द्यायची ? सत्ता,पैसा,दादागिरीचा माज आलाय. हा माज जनतेनं उतरवला पाहिजे. अशा टग्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. तिथल्या तिथेच ठेचून काढली पाहिजे. माझं बोलणं जर सहन होत नसेल तर कानात बोळे घाला. जशाच तसे उत्तर द्याची एवढीच जर हिंमत असेल तर शेजारच्या गुजरात,तामिळनाडूला द्या. त्यांच्यासारखं विकासाचं खरं काम करून दाखवा वेशीवर येऊन जाहीर सत्कार करीन तुमचा असा खणखणीत टोला राज यांनी लगावला.पवारसाहेब, दुष्काळ सरकार निर्मित की निसर्गनिर्मित ?राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. लोकांना प्यायला पाणी नाही, गुरांना चारा नाही. लोकांनी सोनं-नाणं गहाण ठेवून शहरांची वाट धरली आहे. ज्या मुक्या जनावराला लहानचं मोठं केलं त्या जनावरला मृत्यूच्या दारात ढकलावं लागतं आहे. याला राष्ट्रवादी जबाबदार आहे. 1992 पेक्षा भीषण दुष्काळ पडलाय आहे अशी कबुली शरद पवार दिली. मग पवार साहेब, माझ्या पोरकट प्रश्नांचं उत्तर द्या, तुम्ही दिल्लीत आहात. राजकारणातले जुने,अनुभवी नेते आहात. आमच्या बालबुद्धीत भर पडले म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, हा दुष्काळ सरकार निर्मित आहे की निसर्गनिर्मित आहे ? सिंचन प्रकल्पांवर कोट्यावधींचा खर्च करण्यात आला आहे. मग धरणं का उभी राहिली नाही ? दुष्काळ कसा पडला ? इतका खर्च झाला तर तो कसा झाला ? आणि दुष्काळ जर एवढाच खुपत असेल तर एप्रिल महिन्यात होणारे आयपीएलचे सामने रद्द करणारा का ? असा थेट सवाल राज यांनी शरद पवारांचा विचारला आहे. तसंच या प्रकल्पांनावर इतका खर्च का झाला ? याचा पुरावा म्हणून राज यांनी 'तहलका'चा अंक सभेत सादर केला. 70 हजार कोटी गेले कुठे ? असा सवाल पुन्हा एकदा अजित पवारांना राज यांनी विचारला

Live TV

News18 Lokmat
close