#कोल्हापूर

Showing of 2198 - 2211 from 2233 results
पंचगंगा नदीच्या प्रदुषणाविरोधात नागरिकांची मोहीम

बातम्याJan 13, 2009

पंचगंगा नदीच्या प्रदुषणाविरोधात नागरिकांची मोहीम

13 जानेवारी, कोल्हापूरकोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. पंचगंगा नदी बचाव प्रेमींनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाला धारेवर धरलं. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियत्रण महामंडळानं प्रदूषणाला जबाबदार असणार्‍या घटकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.उगमापासूनच पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळाख्यात आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पंचगंगेचं रुंपातर गटारगंगेत झालंय. त्यामुळे सुमारे चार लाख लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्याचबरोबर पाण्यातली जैवविविधताही संकटात सापडलीय. पंचगंगा सवर्धन समितीनं आंदोलन करून प्रदूषण नियत्रण मंडळाला कारवाई करायला भाग पाडलं आहे. "आम्ही महापालिका आणि प्रदूषणाला जबाबदार असणार्‍या कारखान्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे" असं प्रदूषण नियंत्रक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी व्ही. एन. मुंडे यांनी सांगितलं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं एकूण 35 घटकांना पंचगंगेच्या प्रदूषणासाठी जबाबदार धरलंय. त्यात कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, आणि पाच साखर कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याला कारखाना बंद का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. इचलकरंजीतल्या 26 कापड प्रोसेसनाही कारणे दाखवा नोटीस बजावून काहींचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आलं आहे.इतकं सगळं होऊनही कोल्हापूर महापालिकेनं पंचगंगेच्या प्रदुषणाकडे दुर्लक्षच केलं आहे. म्हणूनच फक्त नोटीस बाजावून उपयोग होणार नाही. तर संबधित घटकावर कारवाई करण्याची गरज आहे.