#कोल्हापूर

Showing of 1496 - 1509 from 1563 results
संमेलनाध्यक्षपदी उत्तम कांबळे

बातम्याSep 29, 2010

संमेलनाध्यक्षपदी उत्तम कांबळे

29 सप्टेंबरठाण्यात होणार्‍या 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार उत्तम कांबळे विजयी झाले आहेत. मुंबईतल्या साहित्य संघाच्या ऑफीसमध्ये आज मतमोजणी झाली. एकूण 642 जणांनी मतदान केले. त्यापैकी उत्तम कांबळेंना तब्बल 411 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी चंद्रकुमार नलगेंना 101, तर गिरिजा कीर यांना 95 मते मिळाली. सध्या सकाळ वृत्तसमूहाच्या प्रमुख संपादकपदी असणार्‍या कांबळे यांचा प्रवास मोठा खडतर झाला आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी इथे एका शेतमजूर कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. कंपाऊंडर , वाईंडर, शेतमजूर, हमाली, पेपर विकणे अशी कामे करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेणारे त्यांच्या कुटुंबातील ते पहिलेच. आज शोषितांचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भारतातील सामाजिक व्यवस्थेचे ते गाढे अभ्यासक आहेत. भटक्या विमुक्तांसाठी त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. देवदासींच्या जीवनावर त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषेतही अनुवाद झाले आहेत. त्याचबरोबर त्यांना साहित्य आणि पत्रकारितेतील अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. उत्तम कांबळे यांची साहित्यसंपदाकथासंग्रह रंग माणसांचेकावळे आणि माणसेकथा माणसांच्यान दिसणारी लढाईपरत्याकादंबरी अस्वस्थ नायकश्राद्ध कविता संग्रह जागतिकीकरणात माझी कवितानाशिक : तू एक सुंदर कविता (खंडकाव्य)आत्मकथन वाट तुडवतानाआई समजून घेतानाएका स्वागताध्यक्षाची डायरीललित साहित्य थोडसं वेगळंकुंभ मेळ्यात भैरूनिवडणुकीत भेरूसंशोधनपर ग्रंथ देवदासी आणि नग्न पूजाभटक्यांचे लग्नकुंभ मेळा : साधूंचा की संधीसाधूंचाअनिष्ट प्रथावामनदादांच्या गीतातील भीम दर्शनसंपादन कर्मवीर दादासाहेब गायकवाड काल आणि कर्तृत्त्वगजाआडच्या कविता प्रथा अशी न्यारीझोत : सामाजिक न्यायावरजागतिकीकरणाची अरिष्टेडोंगरासाठी काही फुलेरावसाहेब कसबे यांचे क्रांतीकारी चिंतनलढणार्‍यांच्या मुलाखतीशेतकर्‍यांच्या आत्महत्या एक शोध

Live TV

News18 Lokmat
close