#कोल्हापूर

Showing of 1 - 14 from 1017 results
VIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न

महाराष्ट्रSep 21, 2018

VIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न

कोल्हापूर, २१ सप्टेंबर- कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव गावात असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये भर दुपारी चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय कशा पद्धतीने हे चोरटे दुकानांमध्ये धाक दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दरोडेखोरांनी हातामध्ये जी पिस्तूल घेतली होती ती खेळण्यातली पिस्तूल असल्याचंही समजलं. मात्र नागरिकांनी पाठलाग सुरू करताच हे सगळे दरोडेखोर पसार झाले. त्यामुळे कुणालाही पकडण्यात यश आले नाही. हे चौघे तरुण हिंदीमध्ये संभाषण करत होते आणि त्यांचं वय २५ ते ३८ वयोगटातील होतं अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे आता या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.

Live TV

News18 Lokmat
close