नरसिंहपूर, 24 जुलै: मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील करेली परिसरात तरुणाने आपल्या पत्नीची बेदम मारहाण केली. छळ करत केलेल्या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा तरुण पत्नीचे केस खेचून तिचा छळ करून मारत आहे हे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केव्हाचा आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही मात्र जुलै 2018मधला असल्याचं म्हटलं जात आहे.