News18 Lokmat

#केरळ

Showing of 313 - 326 from 341 results
केरळमध्ये 'हम दो हमारे दो'साठी सक्तीचा प्रस्ताव !

बातम्याSep 27, 2011

केरळमध्ये 'हम दो हमारे दो'साठी सक्तीचा प्रस्ताव !

27 सप्टेंबरवाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी केरळ सरकारने एक विधेयक विधानसभेत सादर केलंय. दोनपेक्षा जास्त मुलं असणार्‍यांना 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात यावा अशी तरतूद या विधेयकात आहे. मात्र या प्रस्तावित विधेयकाला जोरदार विरोध होत आहे.केरळ हे देशातीलं एक प्रगत राज्य. लोकसंख्या नियंत्रणासाठी या राज्याने आतापर्यंत बरेच प्रयत्न केले. पण सध्या मात्र केरळ सरकारचे वुमेन्स कोड बिल हे विधेयक वादात सापडलंय. या विधेयकाच्या मसुद्यानुसार प्रत्येक जोडप्याला दोनच मुलं असावीत अशी अट घालण्यात येणार आहे. दोनपेक्षा जास्त मुलं झाली तर त्या जोडप्याला दहा हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा तुरूंगवास अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यावर आतापासुन भरपूर टीका होतेय. विशेषत:अल्संख्याक गटांतून याला तीव्र विरोध होतोय.वुमेन्स कोड बिल- लोकसंख्या वाढीवर 10 तज्ज्ञांचा लोकांचा आयोग लक्ष ठेवेल- दोन मुलांपेक्षा जास्त मुलं असल्यास ते जोडपं कायद्यानं अपात्र ठरेल- राज्याच्या कोणत्याही योजनांचे फायदे त्यांना मिळणार नाहीत- धार्मिक आणि राजकीय संघटना कुटुंब नियोजना हस्तक्षेप करु शकणार नाहीऍडव्होकेट राजन म्हणतात, हे विधेयक लोकसंख्या विस्फोटावर उत्तम पर्याय आहे. यामुळे मुलांना चांगल्या वातावरणात वाढण्याचा मुलभूत अधिकार मिळू शकेल. तर समाजकल्याण मंत्री एम.के.मुनीर म्हणतात, हे विधेयक अगदी प्राथमिक टप्प्यात आहे. विविध व्यासपीठांवर याची चर्चा होईल. अनेक गट त्यांची मतं मांडतील. त्यानंतर चर्चा होऊनच हे विधेयक पास होऊ शकेल.मात्र हे विधेयक पास होण्याची कोेणतीही शक्यता नाही, असं निरीक्षक मानतायेत. विशेषत: राज्यातील काँग्रेसचं सरकार हे अल्पसंख्याकांवर अवलंबून आहे. आणि हे विधेयक होऊ नये अशीच अल्पसंख्याक संघटनांची इच्छा आहे. त्यामुळेत आत्ताच या विधेयकाच्या विरोधात होणारी निदर्शनं दुर्लक्ष करून चालणार नाही. पण या विषयावर निर्भेळ चर्चा होणंही तितकंच आवश्यक आहे.