#केईएम

साधना मिल कंपाउंडमधील आग पुन्हा भडकली, अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी

मुंबईDec 29, 2018

साधना मिल कंपाउंडमधील आग पुन्हा भडकली, अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी

स्वाती लोखंडे, मुंबई, 29 डिसेंबर : मुंबईत आणखी एक आगीची घटना घडली आहे. वरळीतील साधना मिल कंपाउंडमध्ये एका इमारतीत आग लागली आहे. मुंबईतील आगीची ही दुसरी घटना आहे. बीडीडी चाळीच्या मागील इमारतीमध्ये ही आग लागली आहे. घटनास्थळी 5 अग्निशमन दलाच्या गाड्यांसह 15 पाण्याचे टँकर दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज सकाळीच लोअर परळ भागातील कमला मिल कंपाऊंडच्या समोर असणाऱ्या ऑर्बिट टेरेस या इमारतीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणली होती.