किंमत Videos in Marathi

Showing of 79 - 92 from 102 results
प्राचीन 350 वर्ष जुनी तोफ जप्त

बातम्याOct 2, 2012

प्राचीन 350 वर्ष जुनी तोफ जप्त

02 ऑक्टोबरमुंबईत सुमारे 350 वर्ष जुनी ऐतिहासिक तोफ जप्त करण्यात आली आहे. धारावी पोलिसांनी काल ही कारवाई केली. धारावी पोलीस स्टेशनचे सीनिअर पीआय अशोक सुर्वेगंध यांना काही व्यक्ती प्राचीन अष्टधातूची तोफ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जवळ सापळा रचला. या कारवाईत 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतल्यावर ही तोफ मिळाली. ही तोफ पिवळ्या रंगांची आहे. साडे वीस इंच लाब आहे. तर मागचा व्यास साडेतीन इंच आहे. या तोफेची किंमत सुमारे 65 लाख रुपये आहे. या प्रकरणी सुरेंद्र उर्फ संजय बन्सीलाल गुप्ता, विजयेंद्र उर्फ विजय कुमार चौहान आणि प्रताप सिंग धरमशेट पालसिंग या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही मुंबईत काही वर्षापासून राहत आहे.