#काश्मीर

Showing of 1158 - 1171 from 1210 results
काश्मिरातील शिष्टमंडळात मतभेद

बातम्याSep 21, 2010

काश्मिरातील शिष्टमंडळात मतभेद

21 सप्टेंबरतर काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेले आहे. या शिष्टमंडळातील काही नेत्यांनी काल फुटीरवादी नेत्यांची भेट घेतली होती. फुटीरवादी नेत्यांनी या शिष्टमंडळात सहभागी व्हायला नकार दिला. पण या शिष्टमंडळातील नेत्यांनी सामंजस्याची भूमिका दाखवली आणि या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या. पण त्यावरुनच आता वाद सुरू झाला आहे. फुटीरवादी नेत्यांच्या घरी जाऊन भेट घेणे चुकीचे असल्याचे मत सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे. सुषमा स्वराज स्वत: शिष्टमंडळात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे या शिष्टमंडळातच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.