#काव्य

मृत्यूसे भयभीत नही वो....अभिनंदन है या अभिमन्यू; कोर्समेटने केलेली ही कविता ऐकून तुम्हीही द्याल कडक सॅल्युट

व्हिडिओMar 4, 2019

मृत्यूसे भयभीत नही वो....अभिनंदन है या अभिमन्यू; कोर्समेटने केलेली ही कविता ऐकून तुम्हीही द्याल कडक सॅल्युट

मुंबई, 4 मार्च : विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानहून सुखरूप परतल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. अनेकांना स्फुरण चढेल असं काम त्यांनी केलं आणि सोशल मीडियावर यावरून अनेक प्रेरणादायी संदेशही फिरू लागले. पण ही कविता या सगळ्या संदेशांहून वेगळी आहे. कारण ही आहे अभिनंदन यांना जवळून ओळखणाऱ्या त्यांच्या सहाध्यायाने केलेली. विंग कमांडर अभिनंदन यांच्याबरोबर प्रशिक्षण घेतलेला त्यांच्या एका सहाध्यायाने केलेली ही कविता ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल. अभिनंदन यांच्याबरोबर ट्रेनिंगच्या वेळचे अनुभव सांगताना त्यांनी हे काव्य रचलं आहे. पाकिस्तानच्या नापाक इराद्यांवर पाणी फेरणारा हा आपला मित्र ....वो ही सच्चा कोहिनूर है... असं हा अनामिक सहाध्यायी सांगतो, तेव्हा ते मनोमन पटतं.