#काव्य

Showing of 27 - 27 from 27 results
गप्पा सीमा साखरे आणि नितीन पवार यांच्याशी (भाग : 2)

महाराष्ट्रJan 3, 2009

गप्पा सीमा साखरे आणि नितीन पवार यांच्याशी (भाग : 2)

3 जानेवारी हा ज्ञानज्योती सावित्रीबाई यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये सीमा साखरे आणि नितीन पवार आले होत. सीमा साखरे ह्या स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या अध्यक्षा आहेत. तर नितीन पवार हे महात्मा फुले विचारांचे अभ्यासक आहेत. नितीन पवार सांगतात, " सावित्रीबाई फुले यांना क्रांतिज्योती म्हणतात. त्यांनी खूप काम केलं आहे. स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत त्यांनी पेटवली आणि त्या ज्योतीमुळं मुली आज शिकत आहेत. सावित्री बाईंनी ज्ञान मंदिरं सुरू केली आहेत. सावित्री बाईंच्या शाळा ह्या सावित्री बाई फक्त शाळा सुरू करून थांबल्या नाहीत तर साधवा आणि विधवा यांना समान वागणूक दिली. सावित्री बाईंंच्या शाळांतून या मुलींना स्वावलंबनाचे धडे दिले आहेत." नितीन पवार सांगतात, " पुण्यासारख्या ठिकाणी शाळा काढणं सोपं नव्हतं. पण सावित्री बाईंनी ती काढली. त्या पहिल्या मराठीतलं आधुनिक कवयित्री आहेत. त्यांचा ' गाव आपुले बरा ' हा काव्य संग्रह आहे. सत्यशोधक समाजाच्या नेत्या होत्या. ज्योतीरावांची त्या सावली होत्या. " सावित्रीबाईंविषयी सीमा साखरे आणि नितीन पवार यांनी सांगितलेली माहिती व्हिडिओवर बघता येईल.

Live TV

News18 Lokmat
close